10 November 2011

श्रीमन्महाभारत - शांतिपर्व

"महाभारत" भारतवर्षातील सनातन वैदिक संस्कृतीचा एक महान ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे अमूल्य रत्‍नांचे भांडार आहे. यात उपनिषदांचे संपूर्ण सार आले आहे. यात गूढार्थमय ज्ञान विज्ञान आहे, हा धर्मग्रंथ आहेच आणि त्या अनुषंगानुसार यात राजनितिचे दर्शन, कर्मयोग सिद्धांत, भक्तिशास्त्र, अध्यात्मशास्त्र - थोडक्यात याला सर्वशास्त्रसंग्रह म्हणता येईल एवढी याची व्याप्ती आहे.

या ग्रंथात एकूण १८ विभाग आहेत ज्याला पर्व ही संज्ञा दिली आहे. प्रत्येक पर्वात आणखी काही उपपर्वे आहेत. यातील १२ वे पर्व आहे शांतिपर्व. यात तीन उपपर्वे येतात. त्यातील अंतिम पर्व आहे ’मोक्षधर्मपर्व’. या पर्वात १७४ ते ३६५ असे एकूण १९२ अध्याय आलेले आहेत. यात चार पुरुषार्थ, अध्यात्म, नीति, आचार, मानवी जीवनाचे स्वरूप व त्याचे अंतिम उद्दिष्ट, सृष्टी उत्पत्ति व तिचा लय, मानवी देह व त्या अंतर्गत बुद्धि, मन, चित्त याचे स्वरूप, जीव, आत्मा, परमात्मा यांचे स्वरूप, ज्ञान, योग इत्यादिंचे सखोल विवेचन - हे सर्व आले आहे. थोडक्यत मोक्षधर्मपर्व हा ज्ञानकोश आहे.

सामान्य माणसाला महाभारत या ग्रंथाची व्याप्ती, मुख्य म्हणजे ग्रंथाचा आकार बघूनच भिती वाटते. या ग्रंथाचा संग्रह करणार्‍यांमध्येही याचे वाचन सहसा होत नाही. मी मोक्षपर्व एकदा वाचल्यावर वाटले की याचे सतत वाचन आवश्यक आहे. पण वाचन म्हणावे तसे घडत नाही. महाभारतातीला या भागाचे Audio Book तयार करावे वा कोणा चांगल्या आवाज असलेल्या व्यक्तिकडून वाचन करून घ्यावे अशी बरेच दिवसांपासून इच्छा होती. या संदर्भात अनेकांशी चर्चा केली पण योग्य व्यक्ति सापडेना. एकदा माझे परम आदरणीय स्नेही श्री. दिलिप आपटे यांच्याशी या संदर्भात बोलल्यावर त्यांनाही ही कल्पना आवडली. आणि नुसते ’कल्पना छान आहे’ एवढे म्हणून ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. जवळपास अर्धे वाचन झाले आहे आणि त्या सर्व लिंक्स् खाली दिलेल्या आहेत. मला व्यक्तिगत लाभ होतोच आहे. या श्राव्य फिती iPod, mobile वर जोडून केव्हांही ऐकता येत असल्यामुळे वरवरचेवर याचा लाभ घेता येतोय. इच्छुकांनीही याचा लाभ घ्यावा.

भाग  पहिला          -          अध्याय १७४ ते २००

भाग  दुसरा            -          अध्याय २०१ ते २४०

भाग  तिसरा          -          अध्याय २४१ ते २८०

भाग  चवथा           -          अध्याय २८१ ते ३२०

भाग  पाचवा          -          अध्याय ३२१ ते ३६५