10 November 2011

श्रीमन्महाभारत - शांतिपर्व

"महाभारत" भारतवर्षातील सनातन वैदिक संस्कृतीचा एक महान ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे अमूल्य रत्‍नांचे भांडार आहे. यात उपनिषदांचे संपूर्ण सार आले आहे. यात गूढार्थमय ज्ञान विज्ञान आहे, हा धर्मग्रंथ आहेच आणि त्या अनुषंगानुसार यात राजनितिचे दर्शन, कर्मयोग सिद्धांत, भक्तिशास्त्र, अध्यात्मशास्त्र - थोडक्यात याला सर्वशास्त्रसंग्रह म्हणता येईल एवढी याची व्याप्ती आहे.

या ग्रंथात एकूण १८ विभाग आहेत ज्याला पर्व ही संज्ञा दिली आहे. प्रत्येक पर्वात आणखी काही उपपर्वे आहेत. यातील १२ वे पर्व आहे शांतिपर्व. यात तीन उपपर्वे येतात. त्यातील अंतिम पर्व आहे ’मोक्षधर्मपर्व’. या पर्वात १७४ ते ३६५ असे एकूण १९२ अध्याय आलेले आहेत. यात चार पुरुषार्थ, अध्यात्म, नीति, आचार, मानवी जीवनाचे स्वरूप व त्याचे अंतिम उद्दिष्ट, सृष्टी उत्पत्ति व तिचा लय, मानवी देह व त्या अंतर्गत बुद्धि, मन, चित्त याचे स्वरूप, जीव, आत्मा, परमात्मा यांचे स्वरूप, ज्ञान, योग इत्यादिंचे सखोल विवेचन - हे सर्व आले आहे. थोडक्यत मोक्षधर्मपर्व हा ज्ञानकोश आहे.

सामान्य माणसाला महाभारत या ग्रंथाची व्याप्ती, मुख्य म्हणजे ग्रंथाचा आकार बघूनच भिती वाटते. या ग्रंथाचा संग्रह करणार्‍यांमध्येही याचे वाचन सहसा होत नाही. मी मोक्षपर्व एकदा वाचल्यावर वाटले की याचे सतत वाचन आवश्यक आहे. पण वाचन म्हणावे तसे घडत नाही. महाभारतातीला या भागाचे Audio Book तयार करावे वा कोणा चांगल्या आवाज असलेल्या व्यक्तिकडून वाचन करून घ्यावे अशी बरेच दिवसांपासून इच्छा होती. या संदर्भात अनेकांशी चर्चा केली पण योग्य व्यक्ति सापडेना. एकदा माझे परम आदरणीय स्नेही श्री. दिलिप आपटे यांच्याशी या संदर्भात बोलल्यावर त्यांनाही ही कल्पना आवडली. आणि नुसते ’कल्पना छान आहे’ एवढे म्हणून ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. जवळपास अर्धे वाचन झाले आहे आणि त्या सर्व लिंक्स् खाली दिलेल्या आहेत. मला व्यक्तिगत लाभ होतोच आहे. या श्राव्य फिती iPod, mobile वर जोडून केव्हांही ऐकता येत असल्यामुळे वरवरचेवर याचा लाभ घेता येतोय. इच्छुकांनीही याचा लाभ घ्यावा.

भाग  पहिला          -          अध्याय १७४ ते २००

भाग  दुसरा            -          अध्याय २०१ ते २४०

भाग  तिसरा          -          अध्याय २४१ ते २८०

भाग  चवथा           -          अध्याय २८१ ते ३२०

भाग  पाचवा          -          अध्याय ३२१ ते ३६५


05 October 2011

श्रीज्ञानेश्वरांचा हरिपाठ  -  


   श्रीज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजे वारकर्‍यांचे जीवन. यात अवघे २७ अभंग आहेत. अर्थदृष्ट्या त्यांची व्याप्ती पाहता सामान्य जनच काय पण त्यावर प्रवचन, निरूपण करणारेही हरखून जातात. कोणीकोणी तर एकेका अभंगावर आठवडाभरही बोलू शकतात. अशीच काही निरूपणे श्री. अण्णा घाणेकर यांची काही निरूपणे सांगली येथे १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दरम्यान सांगली येथे झाली होती. सगळ्याच अभंगांवर काही निरूपणे होऊ शकली नाहीत. पण या काळात त्यांनी पहिल्या ६-७ अभंगांची चर्चा केली. १२ निरूपणाच्या श्राव्य फिती आणि शेवटची (१३ वी-काल्याची) श्री. अण्णांच्या कीर्तनाची फीत आहे.  साधकांना आवडतीलच असा विश्वास आहे. पहा कशी वाटतात आणि आपले मत [feedback] कळवा.

DOWNLOAD [Right click to save]

निरूपण  १
निरूपण  २
निरूपण  ३ 
निरूपण  ४
निरूपण  ५ 
निरूपण  ६
निरूपण  ७
निरूपण  ८ 
निरूपण  ९
निरूपण  १०
निरूपण  ११
निरूपण  १२
निरूपण  १३-कीर्तन

01 August 2011

श्रीमद्‍ भागवतमहापुराणम् - मराठी

श्रीमद्‍ भागवतमहापुराणम्  -  मराठी 

    भक्तिसाहित्यात श्रीमद् भागवत सर्वात् उच्च श्रेणीचा ग्रंथ आहे. तसेच सर्व पुराणामध्ये सर्वात जास्त अध्ययन होत असेल तर श्रीमद् भागवताचेच असे म्हणायला हरकत नसावी. याचे कारण काय असावे ? महाभारतात, विशेषतः महाभारताचा खिलभाग असलेल्या हरिवंशपुराणात आलेले कृष्ण चरित्र पाहता भागवतात कृष्णचरित्राबद्दल अधिक माहिती आहे असे नव्हे. पण दोन ग्रंथातील चरित्र शैलीन महद् अंतर आहे.. महाभारतात ऐतिहासिक वर्णन आहे तर भागवतात जगन्नियंत्या परमेश्वराच्या लीलांचे भावमय, रसाळ दर्शन आहे.
    श्रीमद् भागवत ग्रंथ तसा आकार-विस्ताराने लहान नाही. कथा सप्ताह करणारे सहसा एका सप्ताहात सर्व भागवत कथन करू शकत नाहीत. संस्कृत संहितेचे अध्ययनही सोपे नाही. त्याच्या मराठी अनुवादाचे संपूर्णपणे वाचन करणेही कठीण आहे. यात ३३५ अध्याय असून ते १२ स्कंधात विभागलेले आहेत. स्कंध १ ते ९ यांना कृष्णकथेची प्रस्तावना मानली लाते. कृष्णकथा मुख्यतः १० व्या स्कंधात असून त्यात ९० अध्याय आहेत. ११ व्या स्कंधात कृष्णाचे परलोक गमनापूर्वी त्याने उद्धवास सांगितलेली उद्धव गीता आली आणि १२ स्कंध उपसंहाराचा.

    सध्या ग्रंथ वाचनापेक्षा ग्रंथ श्रवण करणे (Audio Books) त्याच्या सुलभतेमुळे लोकप्रिय झाले आहे. मराठी ग्रंथांचे Audio Books तसे अजून प्रचलित नाहीत. पण या प्रणालीचा वापर करून कोणत्याही ग्रंथाचा हवा तेव्हढा भाग हवा तेव्हां ऐकणे आता iPod, mobile वगैरे साधनांमुळे फारच सोपे झाले आहे. गीताप्रेसच्या ’श्रीमद्‌भागवतमहापुराणम् - केवळ मराठी अनुवाद’ याचे श्राव्य संस्करण प्रस्तुत करीत आहोत.


श्राव्य सादरीकरण सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या सौजन्याने -  

    स्कंध  पहिला  
    स्कंध  दुसरा     
    स्कंध  तिसरा   
    स्कंध  चवथा     
    स्कंध  पाचवा   
     स्कंध  सहावा   
    स्कंध  सातवा  
    स्कंध  आठवा  
    स्कंध  नववा   
    स्कंध  दहावा(पूर्वार्ध) 
  स्कंध  दहावा(उत्तरार्ध) 
  स्कंध  अकरावा   
   स्कंध  बारावा