01 August 2011

श्रीमद्‍ भागवतमहापुराणम् - मराठी

श्रीमद्‍ भागवतमहापुराणम्  -  मराठी 

    भक्तिसाहित्यात श्रीमद् भागवत सर्वात् उच्च श्रेणीचा ग्रंथ आहे. तसेच सर्व पुराणामध्ये सर्वात जास्त अध्ययन होत असेल तर श्रीमद् भागवताचेच असे म्हणायला हरकत नसावी. याचे कारण काय असावे ? महाभारतात, विशेषतः महाभारताचा खिलभाग असलेल्या हरिवंशपुराणात आलेले कृष्ण चरित्र पाहता भागवतात कृष्णचरित्राबद्दल अधिक माहिती आहे असे नव्हे. पण दोन ग्रंथातील चरित्र शैलीन महद् अंतर आहे.. महाभारतात ऐतिहासिक वर्णन आहे तर भागवतात जगन्नियंत्या परमेश्वराच्या लीलांचे भावमय, रसाळ दर्शन आहे.
    श्रीमद् भागवत ग्रंथ तसा आकार-विस्ताराने लहान नाही. कथा सप्ताह करणारे सहसा एका सप्ताहात सर्व भागवत कथन करू शकत नाहीत. संस्कृत संहितेचे अध्ययनही सोपे नाही. त्याच्या मराठी अनुवादाचे संपूर्णपणे वाचन करणेही कठीण आहे. यात ३३५ अध्याय असून ते १२ स्कंधात विभागलेले आहेत. स्कंध १ ते ९ यांना कृष्णकथेची प्रस्तावना मानली लाते. कृष्णकथा मुख्यतः १० व्या स्कंधात असून त्यात ९० अध्याय आहेत. ११ व्या स्कंधात कृष्णाचे परलोक गमनापूर्वी त्याने उद्धवास सांगितलेली उद्धव गीता आली आणि १२ स्कंध उपसंहाराचा.

    सध्या ग्रंथ वाचनापेक्षा ग्रंथ श्रवण करणे (Audio Books) त्याच्या सुलभतेमुळे लोकप्रिय झाले आहे. मराठी ग्रंथांचे Audio Books तसे अजून प्रचलित नाहीत. पण या प्रणालीचा वापर करून कोणत्याही ग्रंथाचा हवा तेव्हढा भाग हवा तेव्हां ऐकणे आता iPod, mobile वगैरे साधनांमुळे फारच सोपे झाले आहे. गीताप्रेसच्या ’श्रीमद्‌भागवतमहापुराणम् - केवळ मराठी अनुवाद’ याचे श्राव्य संस्करण प्रस्तुत करीत आहोत.


श्राव्य सादरीकरण सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या सौजन्याने -  

    स्कंध  पहिला  
    स्कंध  दुसरा     
    स्कंध  तिसरा   
    स्कंध  चवथा     
    स्कंध  पाचवा   
     स्कंध  सहावा   
    स्कंध  सातवा  
    स्कंध  आठवा  
    स्कंध  नववा   
    स्कंध  दहावा(पूर्वार्ध) 
  स्कंध  दहावा(उत्तरार्ध) 
  स्कंध  अकरावा   
   स्कंध  बारावा